Wednesday, September 22, 2010

सुट्टी संपली!

गेलं दीड वर्ष उन्हाळ्याची सुट्टी माझ्या डोक्यातला एक कप्पा झाली आहे. या कप्प्यात मला माहिती नसलेले खूप "धडे" लपले होते. ते माझे मलाच या गोष्टी लिहिताना समजले. या ब्लॉगला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद मला अगदीच अनपेक्षित होता. आधी मला मराठीत नीट लिहिता येईल की नाही याचीच मला खात्री नव्हती. त्यामुळे हळू हळू वाचकांच्या प्रतिक्रियांमधून माझी लेखनशैली कशी आहे, ती लोकांना का आवडते (म्हणजे ज्यांना आवडते त्यांना बरं का!) आणि मुख्य म्हणजे या गोष्टी वाचकांना त्यांच्या अनुभवांचीदेखील आठवण करून देतात, हे मला समजलं. पण सुरुवातीला हे लेख लिहिण्यामागे माझा खास असा काहीच हेतू नव्हता. फक्त माझ्या आजारी आजीला माझ्या लहानपणीच्या गोष्टी ऐकून बरं वाटावं हा एक उद्देश होता.
हा ब्लॉग मी माझ्या देशापासून दूर राहात असताना लिहिला. त्यामुळे तो लिहित असताना, माझ्या आजूबाजूचं जग आणि माझ्या गोष्टींमधलं माझं जग यातला मोठा फरक सतत माझ्या डोळ्यांसमोर तरळत असायचा. आणि या प्रक्रियेमुळे मी काही दिवस नकळत मी विद्यार्थी झाले. या विद्यार्थीदशेतल्या उपविद्यार्थी दशेत माझ्या लबच्या बाहेरच्या जगातली गणितं मी माझ्या या सुट्टीच्या शिदोरीने सोडवायचा प्रयत्न केला. त्यात मुख्यत: मला शहाणं असण्यामधला आणि सुशिक्षित (किंवा उच्चशिक्षित) असण्यामधला फरक लक्षात आला. या दोन गोष्टी नेहमी एकत्र दिसतीलच असं नाही. माझ्या आयुष्यात प्रभावी ठरलेली बरीच शहाणी माणसं उच्चशिक्षित नव्हती, पण आजही प्रत्येक अडचणीच्या, आनंदाच्या क्षणी मला त्यांची आठवण येते. माझ्या दोन आज्या माझ्या बालपणीच्या गोष्टींमधल्या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. आणि दोघींच्याही भिन्न पण प्रभावी शहाणपणाचा मला अजून उलगडा होतो आहे.
तसंच आनंदी बनण्यासाठी खरं तर कुठलीच गुंतवणूक लागत नाही हादेखील माझ्या सुट्टीमधल्या पात्रांचा एक महत्त्वाचा संदेश आहे. त्यामुळे मला अमुक अमुक मिळाल्याने मी खूप आनंदी होईन, असा विचार करण्याची माझी वृत्ती या लेखांमुळे कमी झाली आहे. आणि असा निरुद्देश आनंद, "आनंदी होण्यासाठी" म्हणून आखून ठेवलेल्या त्या ध्येयांकडे जाण्यात खूप उपयोगी पडतो. त्यामुळे हे दीड वर्ष मला खूप काही शिकवून गेलं. हे लेख लिहिण्यासाठी मी माझ्या अभ्यासातून आणि प्रयोगशाळेतल्या कामातून वाचलेला वेळ वापरायचे. त्यामुळे बसमधून घरी येताना, किंवा ट्रेनमध्ये खिडकीबाहेर बघत बघत यातील बरेच पोस्ट मी तयार केले. शक्यतो दर आठवड्यात काहीतरी नवीन लिहायचं असा स्थूल नियम स्वत:ला देऊन मी हे पोस्ट लिहिले. त्यामुळे वेळेच्या नियोजनाचे खूप महत्त्वाचे धडे मला हे लेख लिहिताना मिळाले.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायत्रीसारखी हुशार मैत्रीण माझे लेख तपासून द्यायला पुढे आली. कोल्हापूरबद्दल ऑस्ट्रेलियात बसून मी लिहिणार आणि अमेरिकेत राहणारी दुसरी कोल्हापूर-कन्या ते तपासणार या सोहळ्याचं खूप कौतुक वाटतं. सुट्टीच्या प्रत्येक पोस्टनिशी आमची मैत्री घट्ट होत गेली. गायासारखी मैत्रीण मिळवून दिल्याबद्दलदेखील सुट्टीचे खूप आभार मानावेसे वाटतात. ती उत्तम समीक्षक आहे, पण त्याआधी ती एक प्रामाणिक वाचकदेखील आहे. तिच्यासमोर जे येईल ते ती स्वत:च्या कुठल्याही मताचा चष्मा न लावता वाचते, त्यामुळे मला तिचं मत फार महत्त्वाचं वाटतं. आणि तिच्या दगदगीच्या आयुष्यातून तिनी नेहमी माझ्या लेखनासाठी वेळ काढला यासाठी मी तिची आभारी आहे. केवळ गायत्रीचाच नव्हे तर माझ्या सगळ्या जवळच्या सख्यांचा माझ्या या लेखनात अप्रत्यक्ष सहभाग आहे. चांगल्या मैत्रिणी असणं आणि त्यांचा आयुष्यात सतत स्नेह असणं किती महत्वाचं आहे, हेसुद्धा कदाचित उन्हाळ्याच्या सुट्टीनेच मला दाखवून दिलं.
गेल्या काही महिन्यांत मला हा ब्लॉग इथेच थांबवावा असं वाटत होतं. पण काही आठवणी मृगजळासारख्या तो निर्णय पुढे ढकलायला लावत होत्या. पण आता तो निर्णय पक्का झाला आहे. उन्हाळ्याची सुट्टी इथे संपवत आहे. याचा अर्थ आठवणी संपल्या असा नाही. पण आता आंतरजालावरच्या माझ्या या ओळखीतून बाहेर जाऊन खर्‍या जगातल्या गमतीजमती अनुभवायची इच्छा प्रबळ झाली आहे. तसंच काही पुस्तकं पुन्हा वाचायची आहेत, एखादी नवीन भाषा शिकायचाही बेत आहे. आणि मुख्य म्हणजे पी.एच.डी. संपवून एका खूप शिकवून जाणार्‍या प्रवासाचा शेवट करायचा आहे.
म्हणून सुट्टीची सांगता.
लोभ असावा!
सई

20 comments:

  1. खूप सुरेख झालीये ’सुट्टी’, सई! जुनी पानं चाळायला इथे येत राहीनच. तुझे आभार मानावे तितके कमी आहेत :)

    तुझ्या पुढच्या लिखाणाची वाट पाहतोय!

    ReplyDelete
  2. मला खूप खूप वाईट वाटतंय की ही सुट्टी इतक्या लवकर संपली.
    तरीही, तुझ्या (खरं तर 'माझ्या' वाटणार्‍या) आठवणी इतक्या सुंदर पद्धतीने मांडल्याबद्दल अगदी मनापासून Thank You.
    तुला तुझ्या नविन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

    I'll surely miss you dearly,

    श्रद्धा.

    ReplyDelete
  3. amhi wat pahu... char oli tari chalu thewa..

    ReplyDelete
  4. सुट्टी सुरू होण्याआधी, सुट्टी मिळणार म्हणून झालेला आनंद. सुट्टी उपभोगताना बाकी सर्व जगाचा पडलेला विसर अन सुट्टी संपताना, पुन्हा शाळेत जायची गडबड अन सुट्टी संपल्याची हुरहूर. ह्या सर्व भावना तुझा ब्लॉग वाचताना आम्ही अनुभवल्या.
    खरतर ही आमचीच सुट्टी आम्ही पुन्हा एकदा अनुभवली.

    हवहवस वाटताना थांबण्यात मजा आहे. त्यातच खरा आनंद आहे.

    तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

    आपला,
    (वाचक) अनिकेत वैद्य.

    ReplyDelete
  5. अनिकेतशी सहमत....
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

    -(वाचक) सतीश कुलकर्णी

    ReplyDelete
  6. सई काय लिहू मी! ह्या सुट्टीने मला माझी सई मला पुन्हा लहानाची मोठी होताना दिसली! तिच्यात दड्लेली एक मनस्वी लेखिका मला समजली!आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेणारी रसिका भेटली!
    मुख्य म्हणजे मला माझ्या आयुष्यातल्या सर्व सुखद क्षणांचा रिप्ले दिसला.
    ख-या आयुष्यात देखील कधी मोठी झालीस ते कळलच नाही तसच तूझी हि सुट्टी कधी संपली ते कळालच नाही.
    हि सुट्टी एवढ्यात संपेल अस वाटल नव्हत.
    सई हे क्षण परत दिल्याबद्द्ल धन्यवाद नाही म्हणत.
    मी या ऋणात रहाणच पसंद करीन.

    ReplyDelete
  7. He kay sai,attach tar tuza blog sapadla hota mala...adhashasarkha vachun kadhla...pudhchya post chi vaat pahat hote aani lagech niropachi bhasha?
    Tuzya saglya posts madhun ekhadya jiwlag maitrini sarkhi bhaslis....
    All the best..

    ReplyDelete
  8. अनिकेतशी पूर्ण सहमत आहे. एक-दिड महिन्यांच्या सुट्टी नंतर दहा-अकरा महिन्यांची शाळा असते. सई, शाळा सुरु झाली की तुझ्या शाळेचा पत्ता (म्ह. संकेतस्थळ) मात्र दे बर का!

    ReplyDelete
  9. सई,
    तुझी ही नुसतीच सुट्टी नव्हती, तर सुरेल आठवणींची एक मैफलच जमली होती. प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देणं मनात असूनही शक्य झालं नाही. पण वेळ मिळेल तसे तुझे लेख वाचायला खूप आवडत होतं.
    अर्थात मैफलीला भैरवी असतेच , पण ती पुढच्या मैफलीच्या सुरुवातीसाठी आवश्यक असते.
    अशीच एक नवी मैफल लवकर सुरू होऊ दे. आणि पी एच् डी साठी / पोस्ट डॉक साठी तुला शुभेच्छा!
    भेटत रहा, लिहीत रहा
    --अदिती

    ReplyDelete
  10. "मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला की काय"चं मला फिलिंग येतंय... :(
    खरंच अन्तःकरणाच्या खोलातले खोल टोकसुद्धा "We want more"चा गजर करतंय....
    पण तू जर ह्या निर्णयाप्रत आली असशील तर काही विचार करूनच आली असशील आणि त्यामुळे मी तुझ्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.....
    यदाकदाचित जर तुला ही स्वेच्छा निवृत्ती मागे घ्यावी वाटलीच तर माझ्या सारखे अनेक जण आसावल्या डोळ्यांनी त्या वाटेवरती तुला दिसतील ह्याची तू नक्की खात्री बाळग....

    बाकी पामराच्या शुभेच्छा, सदिच्छा सदैव आपल्यालाला साथ सांगत करतीलच हे सांगणे न लगे ... :)

    ReplyDelete
  11. @ everyone,
    Thank you for your comments and emails that followed. :) Makes me almost want to start writing again. :D
    @Satya,
    Hee nivrutti kayamchi naiye. Arthat it is final for this blog. But I will definitely start writing again next year. Ani tuzya sincere ani khup premal comments sathi a BIG thanks. :)

    Like Shrirang wrote in his email to me, Ata yachya pudhchya "college chya kattyachi" waat baghtoy. :)
    I am sure that will happen.
    Cheers
    Saee

    @baba,
    Aww! Thank YOU. And everyone who made this blog. I was just a reporter. :)

    ReplyDelete
  12. My vaccation lasted for 15 days only. I have started reading this blog 15 days back.

    All the best.

    Cheers

    ReplyDelete
  13. सई,
    हे लेखन थांबवायचे काय डोहाळे लागलेत तुला? मस्त लिहितेस तू. लिहित रहा.
    पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
    धोंडोपंत

    ReplyDelete
  14. Are wah!!
    Alabhya laaab. :)
    Unhalyachi sutti sampli ho pant. Ajun baryach suttya baki ahet. :D

    ReplyDelete
  15. पुन्हा मे महिना सुरु झालाय ..तिथे उन्हाळ्याची सुट्टी सुरु झालीय..काय ठरवलय सई मग?? प्रत्येक सुट्टीमध्ये तुझ्या सुट्टीतली पण चाळायला येऊन जातो पण आता दुसर काही लिहायला घे न...

    ReplyDelete
  16. @Aparna..
    yes..lavkarach. :)

    ReplyDelete
  17. I will miss this blog... This ws one of my favorites. :-)

    ReplyDelete
  18. तुझे लिखाण फार आवडते, मायबोलीवर वाचत होते. आता इथे वाचेन.
    पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  19. लेखनशैली छान आहे. पुन्हा येईन वाचायला!

    "कमेंट अ‍ॅज" सर्वांसाठी खुले करणार का?

    ReplyDelete