Monday, April 20, 2009

फेमिलावाला

कोल्हापुरातली उन्हाळी दुपार स्वत:चं एक छान व्यक्तिमत्व घेऊन यायची. सगळ्या सख्या अाणि अज्ज्या गाढ झोपालेल्या, अाजोबांच्या हलक्या घोरण्याचा अावाज. स्वयपाक घरात नुकत्याच उरकलेल्या जेवणाचा सुगंध! लाकडी जिन्यावरून अाम्ही जशा संध्याकाळी धडाधडा पळायचो, तशी दुपारी पळायची हिम्मतच व्हायची नाही. मग दुपारी अामचे सुद्धा घर-घर, भातुकली, कॅरम असे शांत खेळ रंगायचे! कधी मी व स्नेहा गॅलरीच्या लाकडी गजांमधून अामचे एवढेसे पाय खाली सोडून बसायचो, साबणाचे फुगे उडवत. काचेच्या पेल्यात भरपूर सर्फ, अगदी एकवेळचं धुणं उरकेल एवढं! त्यात फ्रूटी किंवा तसलाच कुठलातरी जपून ठेवलेला स्ट्रॅा! मग दोघी वेगवेगळ्या दिशेला तोंडं करून फुगे उडवायचो. कधी एकमेकींचे फुगे हवेत अापटले की जो काही अानंद व्हायचा तो अोरडून व्यक्त सुद्धा करता यायचा नाही दुपारीमुळे!
पण या निरागस शांततेला एकच अपवाद होता! फेमिलावाला. "फेमिला" नावाच्या हातगाडी मध्ये अाईस्क्रीम घेऊन रोज दुपारी फेमिलावाला यायचा. त्यात पिस्ता, व्हानिला, स्ट्रॅाबेरी असे प्रकार असायचे. तो अाला कि अामचा गुणी शांतपणा एका क्षणात गुल होत असे! मग शक्य तितका कमी पावलांचा अावाज करीत अज्जीच्या खोलीत जायचो. अज्जी दुपारी 
चेह-यावर अोला पंचा टाकून मस्त झोपलेली असायची. क्षणभर माझ्यातल्या सैतानालाही पाझर फुटत असे तिच्याकडे बघून. पण "फेमिलाsss" अशी अारोळी ऐकली कि मग अज्जीला गदागदा हलवून उठवायचो!
 "अज्जी!! ऊठ!! फेमिलावाला अालाय!"
"रोज रोज नाही मिळणार अाईस्क्रीम. झोपू दे मला"
"असं काय गं करतेस! दे की! उद्यापासून नाही मागणार मी."
"असं रोज म्हणतेस. घसा खराब होईल. अाणि पाणी चांगलं नसतं त्यातलं. बर्फ तर अगदी वाईट. गटारातलं पाणी वापरतात ते लोक." (हे असले मन कलुषित करणारे विचार मला अजिबात घाबरवायचे नाहीत)
"असुदेत गटारातलं पाणी. मला नाही काही होत."
" अाई रागावते तुझी मला. तुझे असले लाड केलेले तिला चालत नाहीत."
"पण तू तिची अाई अाहेस ना. मग तू तिला रागवायचंस ना? दे ना गं अज्जी पैसे."

हा सगळा संवाद होईतो फेमिलावाला गल्लीच्या कोप-यावर पोहोचला असायचा. स्नेहा शांतपणे माझा दंगा अाणि हट्ट कधी फळ देईल त्याची वाट बघत बसायची. मग फेमिलावाला पार दिसेनासा झाल्यार अज्जी हळूच पाकिट उघडायची! मला या गोष्टीचा अतिशय राग यायचा. अज्जी खूप चांगली सिनेमा दिग्दर्शक झाली असती. अगदी ट्रेन चौथ्या गिअरमध्ये जाईतो "मत जाअो" अाणि जीव खाऊन पळायला लागेल अशा वेगावर अाली कि "जीले अपनी जिंदगी!".
मग अज्जीनी पैसे दिले कि लगेच अाम्ही पळत सुटायचो! धापा टाकत टाकत फेमिल्याला गाठलं कि दुपारचं सार्थक झाल्यासारखं वाटे! 
मग बराच वेळ गॅलरीतल्या गजांमध्ये पाय लटकवून फेमिलाची कांडी संपवायचो. तोवर चार वाजायचे अाणि अातून मामी-हुकुम यायचा," चहा प्यायला या गं." 
मग चहाबरोबर ,नव्हे चहात चुरडून खारी खायची! कधी चहा कमी पडायचा तर कधी खारी! पण चमच्यानी लगदा खाता येईल इतकी खारी झाली कि परत अामचा मोर्चा गॅलरीकडे!

8 comments:

  1. Hey..sahich!

    अज्जी खूप चांगली सिनेमा दिग्दर्शक झाली असती. अगदी ट्रेन चौथ्या गिअरमध्ये जाईतो "मत जाअो" अाणि जीव खाऊन पळायला लागेल अशा वेगावर अाली कि "जीले अपनी जिंदगी!". I guess...sagalya aaya aani aajya ashyach astat!


    मग चहाबरोबर ,नव्हे चहात चुरडून खारी खायची! कधी चहा कमी पडायचा तर कधी खारी! पण चमच्यानी लगदा खाता येईल इतकी खारी झाली कि परत अामचा मोर्चा गॅलरीकडे! :) thanx athavan karun dilyabaddal..mi visaralech hote asa khayla :)

    ReplyDelete
  2. @ Jaswandi..
    Thanks for the comment!! =)
    Keep writing.
    Cheers
    Saee

    ReplyDelete
  3. अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे..?
    रीसेंट्ली, मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला " क्विलपॅड " /
    आप भी "क्विलपॅड" www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?

    ReplyDelete
  4. No! I have it inbuilt in my mac. :)
    Cheers
    Saee

    ReplyDelete
  5. सई फेमिना वाला माझ्या पण लहानपणी मला आवडायचा.पण तेव्हा मी तूझ्या एवढा लहान नव्हतो.मजा यायची. आई मात्र मला कोआँपरेट करायची.
    मस्त लिहले आहेस!

    ReplyDelete
  6. अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा तो मूज़े मिला " क्विलपॅड " / आप भि " क्विलपॅड" www.quillpad.in का इस्तीमाल करते हे क्या..?

    ReplyDelete
  7. कोल्हापूरच्या फेमिलावाल्याची हाक पण विशिष्ट असायची....."फेमिलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽ एस्केप्‍!!"

    फेमिलाचं ते ’एस्केप्’ ’पिस्ता’ हिरवं किंवा ’काजू’ पिवळसर असायचं. त्यावर एक कागद जिवावर येऊन गुंडाळल्यासारखा असायचा आणि त्यात घुसवलेली काडी नेहमी म्हणजे नेहमी तिरकी असायची!

    :)

    ReplyDelete
  8. फेमिला>> saadhaaran kadheechee gosht aahe hee??

    अज्जी खूप चांगली सिनेमा दिग्दर्शक झाली असती>> hmmm hehe

    tu shukrvaar pethetle raatree dudh, rankaalwyavar bhel aani khaas kolhapuree misal hyaachhee varnan kar na please

    ReplyDelete