तिच्या खोलीत वरती कौलं आहेत. त्या कौलांतून सुरवंट खाली पडायचे. थेट पाठीवरती. मग सकाळी उठल्या उठल्या मी भोंगा पसरायचे. सुरवंटाचे केस टोचले की त्वचेची लाही होते. त्यात जर पाठीवर असेल तर काही विचारूच नका. आमच्या झोपाळ्याच्या समोर एक अपूर्ण भिंत होती. त्यावरच्या रखरखीत दगडांवर पाठ घासून थोडा आराम मिळायचा. तसे नेहमीचे काळे सुरवंट आम्ही खूप क्रूरतेने चिरडायचो. पण कधी एखादा हिरवागार सुरवंट यायचा. त्याला लगेच काड्यापेटीत टाकायचो. सुरवंटाचं फुलपाखरू होतं हे अज्जीनीच सांगितलं होतं आम्हांला. मग काड्यापेटीतल्या सुरवंटाचं फुलपाखरू करायची स्वप्नं बघायचो आम्ही. त्याला तुतूची पानं खायला घाल, कधी पिकलेले तुतूही त्याला द्यायचो. पण असं फुलपाखरू होत नाही हे अज्जीनी समजवायचा प्रयत्न केला.
"त्याला स्वत:हून वाटलं पाहिजे गं, की बास झाला आता हा सुरवंटपणा! आता आपण उडायला हवं!"
"पण अज्जी, फुलपाखरू किती सुंदर असतं! मग सुरवंट लवकर का नाही होत फुलपाखरू?"
"जसा पावसाळा येतो खूप मोठ्या उन्हाळ्यानंतर तसंच आहे! ती वेळ यावी लागते!"
मग कधीतरी आम्ही कंटाळून सुरवंटाला विसरून जायचो आणि अज्जी त्याला हळूच सोडून द्यायची.
कधी गांगरलेल्या संध्याकाळी पाठीवरचा सुरवंट डोळ्यावाटे वाहायचा. उगीच का रडतेस? हा प्रश्न सोडवून द्यायचा. कधी कौलांतून पकडलेले सगळे सुरवंट स्नेहाच्या कंपासपेटीत रांगेत झोपायचे. पण बिचारे नुसतेच गुबगुबीत! आमच्यासारख्या बलदंड राक्षसांपासून कोण वाचवणार त्यांना? कधी चुकून कौलातून पडून जो काय त्रास व्हायचा त्यांचा तेवढाच! बाकी आपले मजेत पानं खात जगायचे. पण फुलपाखरांचा काय दिमाख! घामाघूम होऊन मागे धावून फक्त एकदा पंख बोटाला लागायचे. पण तेवढ्यातही बोटांवर पिवळा केशरी रंग सोडून जायचे. परत कधी होणार हाताला पंख स्पर्श या विचारात कितीतरी अधमुरल्या संध्याकाळी निघून जायच्या. आणि जमिनीला घट्ट चिकटलेल्या पायांना ती सगळी मखमली फुलपाखरं वेडावून दाखवायची!
तिच्या खोलीत झोपताना, तिच्या खिडकीत बसताना या सगळ्याची खूप आठवण झाली. आणि वाटलं, अज्जीसुद्धा तिचं सुरवंटपण संपवून फुलपाखरू झाली. तिच्या पंखांचे सात रंग माझ्या बोटांवर सोडून!!
"अज्जीसुद्धा तिचं सुरवंटपण संपवून फुलपाखरू झाली. तिच्या पंखांचे सात रंग माझ्या बोटांवर सोडून!! "
ReplyDeleteNO COMMENTS!! Touched !!!!
khup chan lihalay. farach sundar.
ReplyDeleteChakali
अप्रतिम... खूप सुंदर लिहिलंय!!
ReplyDeleteसई आज्जी नसतानाची आजोळची ट्रिप खूप त्रासदायक असते मीही अनुभवलंय ते आणि अजुनही अनुभवते...इतकं असतानाही ही पोस्ट तू तितकीच हळुवारपणे लिहिलीस गं...
ReplyDeleteजहापनाह! तुसी ग्रेट हो!! :D
ReplyDeleteसई,
ReplyDeleteआज्जी गेल्यावर त्या घरात जाण सुद्धा नको वाटत मला. माझी आज्जी गेल्यावर अजून आजोळी गेलो नाहीये मी. खूप आठवण येते त्या आठवणीनी. आज ती जखम पुन्हा भळभळून वहायला लागली.
अनिकेत वैद्य.
ह्यावरून मला आलेला १ SMS आठवला.
ReplyDeleteदिवस फुलपाखरांसारखे उडत आले, पकडले, मारले, टाचून ठेवले आठवणींच्या पानावर,
आता जुन्या वह्या चाळताना खाली गळून पडतो फक्त रंग उडालेला थोडा वर्ख अन वाळलेल्या पानांचा चुरा.
खूप आतून, हळुवार लिहिलंय. थेट आज्जी नसलेल्या आजोळी पोहोचवलंस!
ReplyDeletekay lihu var sagaLyani lihiley te sagaLe khare .....
ReplyDeleteKhoop chaan.... khoopach...
ReplyDeleteNo words to explian...
SAY-BHATI haat.... mhanaje???
फारच सुंदर
ReplyDelete@Everyone.
ReplyDeleteThank You all for all the kind words. :)
Cheers
Saee
सयी, खूपच छान लिहल आहेस.
ReplyDeleteसई
ReplyDeleteखरच तू लिहल आहेस तसच अज्जीच फूलपाखरु झाल आणि उडून गेल परत कधीच न येण्यासाठी!
मला तर रडायलाच आल वाचून.सासूबाईंच्या सगळ्या आठवणी कोलाज सारख्या दाटून आल्या.
तूझी ही पोस्त महणजे आज्जीला तू वाहीलेली श्रंधांजलीच आहे.
आम्हा दोघाचे याबद्द्ल तुला धन्यवाद!
बाबा-आई
khupach surekh.
ReplyDeletespeechless !
ReplyDeleteसई, अगं किती हळुवार लिहिलं आहेस तू... अगदी त्या अलवार फुलपाखरासारखं ..... देखणं....नाजूक... आणि मनाला साद घालणारं...!
ReplyDeleteअरुंधती
--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/