......
"अज्जी ग..ऊठ ना!"
"मला भूक लागलीये खूप"
भर दुपारच्या टळटळीत उन्हातून धावत अाजीच्या माडीवरच्या गार-गार खोलीत अाम्ही दाखल व्हायचो. अाम्ही म्हणजे मी व माझी मामे बहीण-स्नेहा. तसं स्नेहा हे तिचं बाहेरचं नाव. पण मी तिला बरीच वर्ष दिदी म्हणायचे. आमच्या लहानपणीच्या "चरित्र-मापनात" दिदी बरीच गुणी असे. मी सुद्धा प्रयत्न केले. पण मला कधीच गुणी होता अाले नाही.
तर अशा उन्हाळयाच्या दुपारी अाजीला झोपेतून उठवून खाऊ मिळवायची जवाबदारी माझी असे. कारण मुलीची मुलगी असल्यामुळे अाणि उन्हाळ्यापुरतीच कोल्हापुरात असल्यामुळे अाजी माझ्यावर रागवत नसे.
मग अज्जी उठायची.
"काय देऊ?"
"माहित नाही. काय काय अाहे अापल्याकडे?"
"मेथीची भाजी अाणि चपाती खातेस?"
कोल्हापुरात सगळेजण पोळीला "चपाती" म्हणायचे. सुट्टी सुरू झाल्यावर पोळी म्हणायची सवय असायची. त्यामुळे मामा माझी "पुणेरी" म्हणून खूप थट्टा करीत असे. सुट्टी संपल्यावर कधी चुकून शाळेत "चपाती" शब्द तोंडून निघाला तर माझ्या पुणेरी मैत्रिणी फिदी-फिदी हसत. मग मला थोडा वेळ स्वत:ची लाज अाणि नरू मामाचा खूप राग येत असे.
"नको. अजून काय अाहे?"
"अजून काय बरं देऊ? ताक-भात अाणि लिंबाचं लोणचं देऊ?"
"शी! मला नक्को जा ताक. अजून काय अाहे ?"
"मग मामीला अामरस काढून द्यायला सांग"
या शेवटच्या वाक्याचे खूप हेतू असत. मामीची झोपमोड व्हावी हा त्यातील सगळयात सोपा हेतू. पण माझ्या या मागणीला ती कसा प्रतिसाद देते त्यावर तिच्या सूनपणाचे निकष ठरत असत.
"नको. अजून काय आहे? मुरंबा अाहे?"
"हो अाहे की ग लाडू!"
"मग मला मुरंबा,तूप अाणि पोळी दे."
मग एका छोट्याशा ताटलीत एका बाजूला मुरंबा अाणि त्यावर चमचाभर तूप आणि दुस-या बाजूला अर्धी पोळी घेऊन आम्ही गॅलरीत जायचो. दिदी गुणी असल्यामुळे काय खायचं हे मीच ठरवायचे नेहमी.
"मुरंबा" हा शब्द मराठीतच व्यक्त करता येतो मनासारखा.म्हणून मराठी ब्लाॅग चा खटाटोप.
मुरंबा आवडला.
ReplyDeleteआज्जी चा आमरसाचा हेतू एकदम पटला.
आत्ता पण सुरेखामामी किंवा मधू मामी आली की त्यांच्याकडून काम करुन घेताना तिच्या बाईला आराम देण्याचा हेतू जास्त असतो.
धन्यवाद बाबा
ReplyDeleteतुझा अभिप्राय महत्वाचा अाहे!
अजून छान छान पोस्ट लिहिणार आहे!
किती सुरेख लिहितेस गं! ’अजून छान छान पोस्टां’ची आतुरतेनं वाट पाहतेय. तुझं आजोळ कुठेय कोल्हापुरात? राजारामपुरी (उच्चारी रॅऽऍम्पुरी) की एकदम शिवाजी/संभाजी पेठ?
ReplyDeleteमस्त. पहिल्या मराठी पोस्टबद्दल हार्दिक अभिनंदन. :)
ReplyDeleteगायत्री,
ReplyDeleteमी रॅमपुरीत राहते. अकराव्या गल्लीत!
राज
धन्यवाद! :)
रारापुरीत का वॉव आम्ही शुक्रवार पेठेत. चांगला आहे की गं हा मुरंबा :)
ReplyDeletephirun punha pahilyapaasn vachtoy aata :)
ReplyDeleteखाण्याच्या पदार्थापासून आपला ब्लॉग सुरू झाला हे वाचून आनंद झाला... :)
ReplyDeleteरोज काहीतरी नवीन वाचावे या हेतूने नवीन-नवीन ब्लॉग शोधत असतो. कुठलाही ब्लॉग नवीनच वाचायला घेतला की त्या ब्लॉगच्या पाहिल्या पोष्टवर जाउन प्रतिक्रिया द्यायची ही आपली स्टाइल... :)
तेंव्हा अगदी २ वर्षा जुन्या पहील्यावहिल्या पोष्टवर प्रतिक्रिया आल्याचे पाहून दचकू नका.. आता संपूर्ण वाचायचा आहे तुमचा ब्लॉग...